मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर मस्त फोटो शेअर करत आहे.
अभिज्ञा लवकरच मेहुल पैसोबत लग्न बंधनात अडकणार आहे.
तिच्या लग्नाच्या विधींना आता सुरुवात झाली आहे.
तिनं आता तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मेहुलसोबत तिनं मस्त कपल फोटोशूट केलं आहे.
मेहंदीसाठी अभिज्ञानं मस्त पिवळ्या रंगाचा ट्रेंडी ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली
या सोहळ्यात अभिज्ञा प्रचंड खूश दिसली.