अनेकांना गंडवणारा मेहुल चोक्सी हनी ट्रॅपमध्ये अडकला? मिस्ट्री गर्लमुळे गूढ वाढलं
मेहुल चोक्सी आपल्या गर्लफ्रेण्डसोबत लक्झरी बोटवर मजामस्ती करण्यासाठी गेला होता का? या महिलेनेच मेहुलला जाळ्यात अडकवून पळवून नेलं होतं का? क्युबाला पळून जाण्याच्या नादात मेहुलला नशिबाने गंडवलं का? असे नाना प्रश्न तपास यंत्रणांसमोर आ वासून उभे आहेत.
1 / 6
भारतातून फरार झालेला उद्योजक मेहुल चोक्सी अँटिग्वाहून डोमिनिकाला कसा पोहोचला, याचं गूढ अधिकच गडद होत चाललं आहे. मेहुलसोबत दिसलेली 'मिस्ट्री वुमन' नेमकी कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ही महिला चोक्सीची गर्लफ्रेण्ड आहे का, या संपूर्ण प्रकरणात तिचा रोल काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
2 / 6
मेहुल चोक्सी आपल्या गर्लफ्रेण्डसोबत लक्झरी बोटवर मजामस्ती करण्यासाठी गेला होता का? या महिलेनेच मेहुलला जाळ्यात अडकवून पळवून नेलं होतं का? क्युबाला पळून जाण्याच्या नादात मेहुलला नशिबाने गंडवलं का? असे नाना प्रश्न तपास यंत्रणांसमोर आ वासून उभे आहेत.
3 / 6
मेहुल चोक्सी अँटिग्वाहून फरार झाल्यानंतर दोन दिवसांनी डोमिनिकामध्ये त्याला अटक झाली. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मेहुल डोमिनिकाला पोहोचला, तेव्हा त्याच्यासोबत एक महिला होती. तीच त्याची कथित गर्लफ्रेण्ड.
4 / 6
दुसरीकडे, हे हनी ट्रॅपचं प्रकरण असल्याचंही बोललं जात आहे. संबंधित महिला अँटिग्वामध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी मेहुलची तिच्याशी ओळख झाली. तिच्या रुपावर भाळलेल्या चोक्सीने तिच्याशी मैत्री केली. 23 मे रोजी महिलेने मेहुलला एका अपार्टमेंटमध्ये भेटायला बोलावलं. तो तिथे गेला असता, आधीपासूनच तिथे काही जण उपस्थित होते. त्यांनी चोक्सीचं अपहरण केलं आणि त्याला डोमिनिकाला नेल्याचं बोललं जातं.
5 / 6
अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनीच पहिल्यांदा मेहुल चोक्सी आपल्या गर्लफ्रेण्डसोबत डोमिनिकाला पोहोचल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र मेहुलच्या भारतातील वकिलांनीही तो डोमिनिकाला पोहोचण्यामागे संबंधित महिलेची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.
6 / 6
मेहुल चोक्सीच्या काही फोटोंमध्ये त्याच्या हातावर जखमा दिसत आहेत. अपहरण करुन चोक्सीला मारहाण केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.