बॉलिवूडचा फिटनेस फ्रीक अॅक्टर आणि मॉडेल मिलिंद सोमणचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेकांचा तो रोल मॉडेलही आहे. वयाच्या 60 व्या वर्षीसुद्धा त्यानं स्वत:ला एकदम फिट ठेवलं आहे.
सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. आता त्यानं सोशल मीडियावर मोठं कॅप्शन देत काही जूने मॉडेलिंग असाइनमेंटचे फोटो शेअर केले आहेत.
मिलिंदनं दोन फोटो शेअर केली आहेत ज्यात तो खूप शांत दिसतोय . त्यानं फोटोंद्वारे कॅप्शनमध्ये एका किस्सा देखील सांगितला, की तो त्याकाळी खूप लाजाळू होता आणि मॉडेलिंगला करिअर मानत नव्हता.
1989 मध्ये झालेल्या कँपेनचा हा फोटो असल्याचं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
या एका तासाच्या कामासाठी तेव्हा त्याला 50, 000 रुपये मिळाले असल्याचा उल्लेखही त्यानं या कॅप्शनमध्ये केला आहे.
#throwback असं हॅशटॅग वापरत तो नेहमीच जूने फोटो शेअर करत असतो.
मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर मिलिंदनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
'रुल्स प्यार का सुपरहिट फॉर्मुला', 'जुर्म', 'बाजीराव मस्तानी' अशा अनेक चित्रपटांमध्ये मिलिंदनं कमाल काम केलं आहे.
आजही अनेक मुलींना मिलिंदवर क्रश आहे. अनेक मुली त्याच्या फिटनेसमुळे त्याला पसंत करतात.