अभिनेत्री सनी लिओनीनं या वर्षीचा ख्रिसमस मुलं, कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला आहे. तिनं या सेलिब्रेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत सनीनं ख्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे. त्यासोबत तिनं फोटोमध्ये असलेल्या मित्रपरिवाराला फोटोमध्ये टॅगसुद्धा केलं आहे.
फोटोमध्ये ख्रिसमससाठी विषेश सजावट केलेली पाहायला मिळतेय.
या फोटोंमध्ये सनी खूप आनंदी दिसत आहे. एका फोटोत तर सनीनं पती डॅनियल वेबरला पाठीवर घेत फोटो काढला आहे.
सनी दरवर्षी ख्रिसमस जोरदार सेलिब्रेट करते. ख्रिसमस सेलिब्रेशनचे तिचे फोटो दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होतात.