अनेकांना प्रतिक्षा होती ती म्हणजे 'मिर्झापूर-2' ही सीरिज रिलीज होण्याची. अखेर तो दिवस आला आहे. अॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर रिलीज झाला आहे. ही सीरिज रिलीज होताच नेटिझन्सना मीम्सचं वेड लागलं आहे. अपेक्षेप्रमाणे मिर्झापूरवर भन्नाट मीम्स तयार करण्यात आले आहेत.
कालपासूनच सोशल मीडियावर #Mirzapur2 हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यात भन्नाट मीम्स पोस्ट करण्यात येत आहेत.
ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाली आहे. मात्र ज्यांच्याजवळ अॅमेझॉन प्राइमची मेंबरशीप नाही ते मागे कसे राहणार. तर त्यांनीही मार्ग काढलाच आणि या मार्गावर धमाल मीम्स तयार होत आहेत. टेलिग्रामवर ही सीरिज मिळाली कसल्यानं हे मीम्स व्हायरल होत आहेत.
तर अनेकांची यात गफलत झाली आहे. कारण क्रिकेट प्रेमींसाठी मुंबई विरुद्ध सीएसकेची आयपीएल मॅच आहे.
पंकज त्रिपाठी यांनी 'मिर्झापूर-२'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचा आनंद भरभरुन पाहायला मिळत आहे.
ही सीरिज मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाहायला मिळाली. अनेकांनी या विरुद्ध प्रोटेस्ट केले त्यांनासुद्धा आता ट्रोल करण्यात येत आहे.