Photo : लाडाच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहिलेत?
VN |
Updated on: Mar 18, 2021 | 11:09 AM
नुकतंच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात तुमच्या लाडक्या कलाकारांनी अनोख्या अंदाजात हजेरी लावलेली पाहायला मिळाली. (Mitali Mayekar's glamorous look)
1 / 5
नुकतंच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात तुमच्या लाडक्या कलाकारांनी अनोख्या अंदाजात हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
2 / 5
सध्या ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या रुपात मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मिताली मयेकर या सोहळ्यात ग्लॅमरस अंदाजात झळकली. काळ्या रंगाच्या या डिझायनर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.
3 / 5
मितालीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.
4 / 5
नुकतंच मिताली बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाह बंधनात अडकली. लग्नानंतरच मितालीनं मेकओव्हर केला होता.
5 / 5
या सोहळ्यात मिताली प्रचंड सुंदर दिसत होती. त्यामुळे तिनं सर्वांची मनं जिंकली. या सोहळ्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मिताली अन्य कलाकारांसोहत धमाल करताना दिसतेय.