Photo | राज्यावरचं कोरोना आणि आर्थिक संकट दूर कर, रोहित पवार सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनाला
Follow us
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यात रोहित पवार आवर्जून वणीच्या सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं.
नाशिक दौऱ्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवीचं काल मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी राज्यावरचं आर्थिक व कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना रोहित यांनी केली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेले 8 महिने होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ टाळेबंदी होती. या सगळ्यात राज्याचं महसुली उत्तन्न देखील बंद होतं. त्यामुळे राज्यावर मोठं आर्थिक संकट आहे. देवीची मनोभावे पूजा करुन कोरोनाचं आणि आर्थिक संकट दूर कर, अशी प्रार्थना केल्याचं रोहित यांनी सांगितलं.
यावेळी रोहित पवार यांच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार आणि आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.