
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा असो वा पत्रकार परिषद ते नेहमीच पारंपारिक सदरा-लेंगा या पोषाखात दिसतात. अपवादाने ते वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतात.

राज्यातल्या विचित्र युत्या, आघाड्यांमुळे मनसेने ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम सुरु केला. त्यात थेट जनतेला सामावून घेतलं.

आज शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘एक सही संतापाची’ माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थिती विरोधात संताप व्यक करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे एक वेगळ्या लूकमध्ये दिसले.

एरवी सफेद रंगाच्या सदरा-लेंग्यामध्ये दिसणारे राज ठाकरे आज टी-शर्ट आणि जीन्स या वेस्टन लूकमध्ये होते. त्यांच्या डोळ्यांवर गॉगल होता.

राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या हॅण्डसम नेत्यांमध्ये गणना होते. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.