Photos : मनसे प्रमुखांना चाहत्यांकडून अनोखी भेट, राज ठाकरेंच्या चंदेरी प्रतिमेसह आकर्षक रेल्वे इंजिन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या चाहत्यांनी एक अनोखी भेट दिली आहे.
Follow us
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या चाहत्यांनी एक अनोखी भेट दिली आहे.
राज ठाकरे यांना त्यांच्या चाहत्यांनी चांदीच्या स्वरुपातील त्यांचं स्वतःचंच छायाचित्र असलेलं स्मृतीचिन्ह भेट दिलं.
या स्मृतीचिन्हात शेजारी राज ठाकरे यांचं निवडणूक चिन्ह असलेलं रेल्वेचं इंजिन देखील आहे. मनसेचे कार्यकर्ते आणि तनिष्क सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पांचाळ यांच्या संकल्पनेतून हे नाणे तयार करण्यात आले आहे. या अस्सल चांदीच्या नाण्याचा संपूर्ण खर्चही मिलिंद पांचाळ यांनीच केला आहे.
ही भेट देताना मिलिंद पांचाळ यांच्यासोबत यशवंत किल्लेदार आणि आनंद प्रभू यांनी म्हटलं आहे, “खूप दिवसांपासून राज ठाकरे यांच्यासाठी चांदीच्या स्वरुपात त्यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह आणि दुसऱ्या बाजूला इंजिन (Memento) बनविण्याची ईच्छा होती. ही इच्छा आज पूर्णत्वास आली.”
“आज 26 ऑक्टोबर 2020 रोजी राज ठाकरेंच्या हस्ते हे स्मृतिचिन्ह त्यांना देण्याचं स्वप्न साकार झालं. याचं समाधान प्राप्त झालं. त्यांचे निरीक्षण कमालीचे होते याचा प्रत्ययही आज आला. जय मनसे”
यावेळी किल्लेदार आणि प्रभू यांनी “सर्व काही राजसाहेबांसाठी, त्यांच्या प्रेमापोटी” असा हॅशटॅगही वापरला आहे.