भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच ओळखली जात नाही, त्याशिवाय ती तिच्या ग्लॅमरस लुक्समुळेही खूप चर्चेत असते.
भोजपुरी अभिनेत्रींमध्ये मोनालिसा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांची हृदयाची धडधड वाढते.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. मोनालिसाने गुलाबी रंगाच्या डीप नेक क्रॉप टॉपसह डेनिम जीन्स असा आऊटफीट केला आहे. यामध्ये मोनालिसा किलर स्टाईलमध्ये तिच्या गॉर्जियस लूकने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.
पोस्ट शेअर करताना मोनालिसाने खास कॅप्शन - 'प्रतिक्रिया देऊ नका पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्वकाही लक्षात घेत आहे'.
एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले - 'सुंदर चित्र', तर दुसऱ्याने लिहिले - 'खूपच अप्रतिम आणि अतिशय सुंदर'. त्याचप्रमाणे इतर चाहतेही हार्ट इमोजींसह प्रतिक्रिया देताना दिसतात.