Gold State : या राज्यात सोन्याचे भंडार! असे नशीब पालटणार
Gold State : भारतात सोने शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. केंद्राने देशातच सोन्याचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया त्यासाठी सर्वेक्षण करणार आहे.
जगात सर्वाधिक सोन्याचा वापर होणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात सणासुदीपासून सर्वच मोठ्या कार्यक्रमात सोन्याचे आभुषण, दागिने घालण्याची परंपरा आहे. भारत जगातून मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो. भारतात पण सोन्याच्या खाणी आहेत. कर्नाटक राज्यातून सर्वाधिक सोन्याचे उत्पादन होते. गेल्या वर्षी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (GSI) सोन्याच्या खाणी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व्हे केला होता. त्यानुसार, भारतात बिहारमध्ये सर्वाधिक सोने असल्याचे समोर आले आहे. देशातील या राज्यांमध्ये खाणीतून सर्वाधिक सोने (Gold Mines) काढण्यात येते.
कर्नाटक भारतातील सर्वात मोठे सोने उत्पादक राज्य आहे. देशातील 80 टक्क्यांहून अधिक सोने कर्नाटक राज्यातील खाणीतून काढण्यात येते. कर्नाटक राज्यातील कोलार गोल्ड फिल्डस ही सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. ती कोलारमध्ये आहे. याशिवाय धारवाड, हसन आणि रायचूर जिल्ह्यातही अनेक खाणी आहेत. त्यातून सोने काढण्यात येते. कर्नाटकमधून 17 लाख टन सोन्याचे भंडार आहे.
त्यानंतर आध्रंप्रदेशचा क्रमांक लागतो. राज्यातील चिगारगुंटा-बिसनाथम गोल्ड ब्लॉक भाडेपट्यावर देण्यात येणार आहे. खाणीत काम करण्याची योजनेसाठी गेल्या वर्षीच राज्य सरकारने या कंपनीला लेटर ऑफ इंटेंट दिले आहे. अनंतपूर जिल्ह्यातील रामगिरी, चित्तूर, पालाच्चूर येथे सोन्याचे भंडार आहेत.
झारखंडमध्ये दरवर्षी जवळपास 344 किलो सोन्याचे उत्पादन होते. राज्यात सुवर्ण रेखा नदीच्या पात्रात सोने आढळते. या नदीच्या वाळूत हे सोने सापडते. झारखंडच्या सिंहभूमी, सोनापट प्रदेशात सोने आढळून येते.
केरळमध्ये पण सोने आढळते. राज्यातील पुन्ना पुझा आणि छवियार पुझा नदीत जवळच्या प्रदेशात सोने सापडते. भारतात सोन्याच्या खाणीचा जुना इतिहास आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिल नुसार, जगभरात आतापर्यंत 2 लाख टनहून अधिक सोने काढण्यात आले आहे.
सर्वाधिक सोने दक्षिण भारतात आहे. कर्नाटक राज्यातच 88 टक्के सोने साठा आहे. हे सोने बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने जवळपास 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
झारखंडमधील ही नदी सुवर्णरेखा म्हणून ओळखली जाते. या नदीतील वाळूतून सोने निघते. सुवर्ण रेखा नदी दक्षिण-पश्चिम वाहते. ही नदी नगडी गावाजवळ उगम पावते. त्या ठिकाणाला रानीचुआं असे नाव आहे. पुढे वाहत जाऊन ही नदी बंगालच्या खाडीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीची एकूण लांबी 474 किलोमीटर आहे.