चांद्रयान 3 हे यान 14 जुलैला अवकाशात झेपावलं. तसं चंद्राबाबतचं कुतुहल आणि अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले. ठिकठिकाणी आपली प्रॉपर्टी असावी, यासाठी लोक लाखो रुपयांची गुंतवणूक करतात.
अनेकांना चंद्रावर आपण जमीन घ्यावी असं वाटतं. पण त्यासाठी कोट्यावधींचा खर्च येईल, असं अनेकांचा समज आहे.
जर खरोखरच तुम्हाला चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल. तर ती तुम्ही केवळ काही हजारांमध्ये खरेदी करु शकता...
Lunarregistry ही वेबसाईट आपण चंद्रावर जमीन देण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचा दावा करते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, हैदराबादमधील राजीव बागडी यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल तर तुम्ही केवळ USD 37.50 म्हणजेच भारतीय रूपयात केवळ 3075 रुपयांमध्ये चंद्रावर एक एकर जमीन तुम्ही खरेदी करू शकता.