राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ब्रेक द चेन मोहीमेला रेल्वे प्रवाशांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशी नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून आले.
रेल्वेत केवळ प्रवाशांनी बसून प्रवास करावा. उभे राहून गर्दी करु नये, असे निर्देश शासनाने दिले होते.
मात्र, सोमवारी प्रवाशी या नियमाला हरताळ फासताना दिसून आले.
अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते.
या सगळ्यामुळे लोकल ट्रेनमधून होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलांवरही लोकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. यावेळी लोक नियमांची तमा न बाळगता एकमेकांना खेटून चालताना दिसत आहेत.
लोकांनी असेच वागायचे ठरवले तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा कसा घालायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.