आज राज्यभरात धो-धो पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय.
आज झालेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय. त्यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय.
कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना तासन् तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागत आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
रेल्वे रुळांवरही पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे लोकलसेवाही विस्कळित झाली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे. स्वत: काळजी घ्या आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.