प्रसिद्धीसाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. यातील एक म्हणजे अभिनेत्री उर्फी जावेद होय. उर्फी स्वतःला प्रसिद्धी मिळावी यासाठी कायमच आपले भिभित्स असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते
कधी सेफ्टी पिन, तर कधी ड्रेसच्या बाहीपासून बनवलेला ड्रेस तर फुल अंगाला चिकटवून बनवलेला ड्रेस घालून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
उर्फीने समुद्रातील शिंपल्यापासून बनवलेली बिकिनी घालून , समुद्र किनाऱ्यावरील आपला अर्धनग्न असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये उर्फी कोणत्याही तमा न बाळगता बिधास्त पोझ देताना दिसून आली आहे.
उर्फीच्या या चित्र विचित्र वर्तनामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे . मात्र कोणत्या प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता तिला हवे तसेच करत असते.