नागिन फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीने लग्नाच्या सात वर्षांनंतर अखेर गोड बातमी दिली आहे. ती आई होणार आहे.
नुकतंच तिने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये तिने तिच्या गरोदरपणाबाबत सांगितलं. तिच्या घरी लहान पाहुण्याचे स्वागत होणार आहे.
यापूर्वीही अनिताने एका व्हिडीओमध्ये तिच्या प्रेग्नेंसीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता तिने बेबी बंपसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
अनिताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.
तिने इतरही काही फोटोज शेअर केले आहेत.
अनिताने इतके दिसव तिची प्रेग्नेंसी कशी लपवली याबाबतही तिने सांगितलं आहे. "मी चार वेळी माझा बेबी बंप कन्सील (मेकअपने लपवणे) करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला मुर्ख बनवण्यात थोडीफार यशस्वी झाली".
बेबी प्लानिंगबाबत तिने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये सांगितलं की सात वर्षांनंतर ती आता आई होणार आहे.
ती आणि तिचा नवरा गेल्या 10 वर्षांपासून सोबत आहे आणि त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाले आहेत. पण ती अखेर 2020 मध्ये बाळासाठी तयार आहे, असंही तिने सांगितलं.
यापूर्वीही अनिता आणि रोहितने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीचे संकेत दिले होते.