नागपुरात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. ढगफुटी सदृश्य पाऊस नागपूरात कोसळला. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नागपुरात एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी भरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत.
नागपूरमध्ये आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव पथकं सक्रीय झाली आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीम बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
नागपुरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.