महाराष्ट्रातल्या या मंदीरात भाविकांची मोठी गर्दी

| Updated on: Aug 21, 2023 | 3:30 PM

नवसाला पावणारा आणि इच्छा पूर्ण करणारा म्हणून या परमेश्वराची ख्याती आहे.सध्या श्रावण सुरू असून मंदिर संस्थांकडून येथे भाविकांसाठी विविध सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. दररोज महाप्रसाद, शिवपुराण, ओम नामाचा जप असे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.

1 / 5
 नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात प्राचीन परमेश्वराचे मंदिर आहे. 400 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर असून या परमेश्वर देवावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. श्रावणात या मंदिरात भाविकांची दर्शनाची मोठी गर्दी होत असते. त्या सोबतच महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मराठवाडा, विदर्भ आणि शेजारच्या तेलंगणा राज्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

2 / 5
श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. नाशिकच्या प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालीय. गेल्या महिनाभरापासून श्रावण अधिक मासमध्ये देखील भाविकांची वर्दळ होती. आज पहिल्या सोमवारी देखील त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक आले आहे.

3 / 5
हजारो भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलाय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातच धार्मिक महत्त्व असलेल्या या महिन्यात भाविकांनी कुटुंबासह दर्शनासाठी हजेरी लावली.

4 / 5
पहिल्या श्रावण सोमवारी जळगावातील ओंकारेश्वर मंदिरावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक वर्ष पुरातन असलेल्या जळगावातील महादेवाच्या ओंकारेश्वर मंदिरावर आज पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचा पाहायला मिळात आहे. श्रावण सोमवार असल्याने मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषनाई करण्यात आली असून या ठिकाणी भाविकांसाठी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

5 / 5
आज पहाटे साडेचार वाजेपासूनच भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. पुरातन आणि जागृत देवस्थान असल्यामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाल. पहाटे पाच वाजेच्या सुमारास महादेवांवर पहिला अभिषेक या ठिकाणी करण्यात आला. दिवसभर याठिकाणी अभिषेक महाआरती, भजन यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.