पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडोल असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असेही मोदी म्हणाले. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवून घरी जाण्याचे आवाहन देखील केले.
देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले. देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले. आम्ही रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडले. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर आहेत
कृषी कायदे मागे घेण्यात आले असले तरी हमीभावाबाबत समितीची नेमणूक करुन योग्य दर दिला जाणार आहे.
मोदी कॅबिनेटची आज महत्वाची बैठक, तीन कृषी कायदे रद्द करण्यावर शिक्कामोर्तब