Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे; सत्याने वर्तावे इशासाठी…!

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला.

| Updated on: Apr 18, 2022 | 3:05 PM
नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर, महाज्योतीच्या व्यवस्थापिका पल्लवी कडू, सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.

1 / 5
समाज प्रबोधनासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीयरत्न’ हे पहिले नाटक आहे. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे फुले यांनी म्हटले आहे. मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी  समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने करावा, असे आवाहन फुले यांनी या नाटकातून केले आहे.

2 / 5
महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरेविरुद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

3 / 5
फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती, तर ती अन्यायाविरूद्ध होती. महाज्योतीच्या वतीने ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. यातून निश्चितच सर्वांचे प्रबोधन होईल, असा आशावाद व्यक्त करून यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

4 / 5
महात्मा फुले यांचे तृतीयरत्न हे नाटक पाहण्यासाठी नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात रसिकांनी तोबा गर्दी केली होती. या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या  शाळेतील 25 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रसिकांसोबत उपस्थित या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.

5 / 5
Follow us
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?.
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.