Photo Gallery : निसर्गाचे धुमशान, लाल-केशरी रंगांची उधळण, उन्हाळ्याच्या चाहुलीनं पळसाला बहार
अमरावती : निसर्गाचीही काय किमया असते बघा, जे पावसाळ्यात होऊ शकत नाही ते भर उन्हाळ्यात पाहवयास मिळत आहे. शोभिवंत फुलासाठी प्रसिध्द असलेला पळस आता अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेत आहे. पळस हा पानझडी वृक्ष फबेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव ब्युटीया मोनोस्पर्मा आहे. साधारणतः हा वृक्ष उत्तर भारतात आढळतो. महाराष्ट्रात पानझडी वनांमध्ये पळस आढळतो.जानेवारी ते मार्च महिन्यात पळसाला केशरी लाल रंगाची फुले येतात.सद्या पळसाचे शोभिवंत झाड बहरले आहे. सध्याच्या रखरखत्या उन्हामध्ये ही पळसाची झाडे वाटसरुंना जणूकाही दिलासा देण्यासाठीच आहेत असेच चित्र आहे.
Most Read Stories