चांद्रयान 3 वेगवान पद्धतीने चंद्राच्या दिशेने झेपावतं आहे. पाच ऑगस्टला चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 3 ने चंद्राचे काही फोटो पाठवले आहेत. हे फोटो सर्वत्र चर्चेत आहेत.
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून हे फोटो आणि व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत.
चांद्रयान 3 आता चंद्राच्या भूमीपासून 170KM x 4313KM अंतर दूर आहे. तर 17 ऑगस्टपर्यंत चांद्रयान 3 ची कक्षा बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.
चंद्राच्या दक्षिण भागावर चांद्रयान 3 उतरणार आहे. याआधी चांद्रयान 1 ने या भागात पाण्याचे अंश असल्याचं शोधून काढलेलं. चांद्रयान 2 ही याच भागात उतरवलं जाणार होतं. पण ते यशस्वी झालं नाही. त्यानंतर आता चांद्रयान 3 इथं यशस्वीरित्या उरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.