गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत असणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज अमरावतीत दाखल झाले.
सुरूवातील त्यांनी नागपुरातील मंदिरात दाखल होत हनुमान चालीसा पठण केलं.
मात्र दुसरीकडे अमरावतीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.
अमरावतीत दाखल होतच राणा दाम्पत्याचा भव्य असा हार घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर यांची एका रथावरून जंगी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी खासदार नवनीत राण या हातात गदा पकडताना दिसून आल्या. या मिरवणुकीची आणि या दमदार स्वागताची सध्या राजकारणात चांगलीच हवा आहे.