Photos: सौरव गांगुलीपासून सर्वसामान्य भक्तांपर्यंत सर्वांकडून उत्साहात दुर्गा पूजा
संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यापासून तर अगदी सर्वसामान्य भक्तांपर्यंत सर्वचजण मनोभावे दुर्गा मातेची पूजा करत आहेत.
संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यापासून तर अगदी सर्वसामान्य भक्तांपर्यंत सर्वचजण मनोभावे दुर्गा मातेची पूजा करत आहेत. अनेक अगदी सेलिब्रेटी आपल्या आनंदाच्या या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नवरात्रीचा हा उत्सव 17 ऑक्टोबरपासून सुरु झाला असून 25 ऑक्टोबरला संपणार आहे. आज महाअष्टमी आहे. नवरात्रीच्या अष्टमीला महागौरीची पूजा केली जाते. त्यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील कोलाकातामध्ये दुर्गा मातेची एका सामूहिक दुर्गा उत्सवात पूजा केली.
Follow us

सौरव गांगुली यांनी महाअष्ठमीच्या दिवशी दुर्गा मातेची आरती देखील केली.
नवरात्रीच्या निमित्ताने जम्मू येथील काली माता मंदिरात देखील भक्तांनी पूजा-अर्चा केली.
रांचीमध्ये देखील अशाप्रकारे उत्साहात दुर्गा मातेची पूजा करण्यात आली.
पाटणात रामकृष्ण आश्रमात देखील एका पुजाऱ्याने विधीवत दुर्गा मातेची पूजा केली.
गोरखपूरच्या बुधिया माता मंदिर तर मातेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघच लागलेली पाहायला मिळाली.