
सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असलेली नव्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबियांसोबतचे, तसेच वेगेवगळे फोटो शेअर करते. पण ती तिचे वडील निखिल नंदा यांच्यासोबत फार कमी दिसते.

अमिताभ यांचा जावई, श्वेता बच्चन हिचा पती, निखिल नंदा हे एक मोठे बिझनेसमन आहेत. एरवी नव्या वडिलांसोबतचे जास्त फोटो शेअर करत नाही. पण तिने नुकतेच बाबांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले.

नव्याने तिच्या वडिलांसोबत त्यांच्या फॅक्टरीचा दौरा केला. निखिल नंदा शेतीशी संबंधित उत्पादने बनवतात. कुटुंबाचा व्यवसाय पाहण्यासाठी नव्याने तिच्या वडिलांसोबत मध्य प्रदेशातील एका साइटला भेट दिली.

एका फोटोमध्ये, नव्या ही निखिल नंदासोबत अनेक ट्रॅक्टरमधून फिरताना दिसत आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवून दोघेही खूप खुश दिसत आहेत.

यावेळी नव्याने पगडीही परिधान केली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर अनेकांनी लाईक्स देत कमेंट्सचा वर्षाव केला.