Sharad Pawar : पंतप्रधानपदाचं स्वप्न अपूर्णच… राजकारणातील चाणक्याचा आज 85 वा वाढदिवस, शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ !

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, राज्यातीलच नव्हे तर देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. गेल्या 6 दशकांपेक्षा अधिक काळ राजकारणात सक्रीय असलेल्या शरद पवार यांनी आपले स्थान किती महत्वाचे आहे हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे.

| Updated on: Dec 12, 2024 | 11:03 AM
राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही एक मुख्य चेहरा असलेले शरद पवार आज दिल्लीत आहेत. तेथे त्यांच्या कुटुंबियांसह अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनीही त्यांची भेट घेतली.( Photos : Social Media)

1 / 7
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आज सोशल मीडियावर शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या, तसेच दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेटही घेतली. यावेळी सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवारही उपस्थित होते.

2 / 7
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.

3 / 7
 1956 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रातील प्रवरानगर येथे गोवा स्वातंत्र्यासाठी निषेध मोर्चा काढला. तरुण वयातच ते राजकारणात सक्रिय झाले. 1958 मध्ये पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

4 / 7
 त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवत काँग्रेस पक्षात हळूहळू त्यांचं राजकीय वजन वाढवलं.

5 / 7
1967 मध्ये शरद पवार 27 वर्षांचे असताना बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडोली. वयाच्या 38 व्या वर्षी, शरद पवार यांनी जनता पक्षासह सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सोडली. 1978 साली ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले.

6 / 7
1988 साली ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. एकूण 4 वेळा ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. 1991 मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये  शरद पवार पंतप्रधान हे संरक्षण मंत्री झाले. तर 2004 मध्ये ते यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री झाले. पंतप्रधानपदाचं त्याचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं.

7 / 7
Follow us
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.