गायिका नेहा कक्कर ही पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न बंधनात अडकली आहे.
नेहाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. तिनं नेहु दा ब्याह या गाण्याची निर्मिती करुन चाहत्यांना आपण लग्न करत असल्याचे संकेत दिले होते.
नेहा आणि रोहनप्रीतनं दिल्लीतील गुरुद्वारात पंजाबी पद्धतीनं लग्न केलं.
गेले काही दिवस नेहा आणि रोहनप्रीतच्या हळदीचे, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.
नेहा आणि रोहनप्रीत लग्न झाल्यापासून फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाची झलक देत आहेत.
आता नेहानं लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात तिनं फिकट गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. सोबतच रोहनप्रीतनंसुद्धा नेहाच्या लेहंग्याला मॅचिंग शेरवानी परिधान केली आहे. या दोघांचे लग्नाचे फोटो मेजर कपल गोल्स देत आहेत.
सर्वांचंच आकर्षण ठरणारं सब्यसाचीनं नेहा आणि रोहनप्रीतचा हा ड्रेस डिझाइन केला आहे.