अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
नेहाने नुकतंच ‘भाभीजी घर पर है’च्या टीमला जॉईन केलं आहे.
मालिकेच्या सेटवर नुकतंच तिचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
सेटवर सगळ्या कलाकारांच्या उपस्थितीत केक कापून नेहाचं स्वागत करण्यात आलं.
यावेळी नेहा पेंडसेने मरून रंगाचीची साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत नेहा पेंडसेसोबत अभिनेत्री शुभांगी अत्रे, अभिनेता रोहिताश गौड आणि आसिफ शेख हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत