छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
अशनूर सोशल मीडियावर नेहमी ट्रेंडी फोटो शेअर करत असते. आता तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ब्लॅक कलरचं फ्लोरल टॉप आणि पेस्टल पिंक पॅन्ट्समध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
अशनूरचा हा लूक समर लूक देतोय. फ्लोरल प्रिंट प्रामुख्यानं उन्हाळ्यात कॅरी केली जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशनूरचा हा लूक ट्राय करू शकता.
अशनूरनं छोट्या पडद्यावर अनेक भूमिका गाजवल्या. ती छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अशनूर कौरनं 2018 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’या चित्रपटात काम केलं होतं. अशनूरच्या या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या.