अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीमध्ये या सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अक्षयचा हा सिनेमा साउथच्या 'कंचना'चा रिमेक आहे.
हंसल मेहताचा यांचा 'छलांग' हा सिनेमा 13 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
येत्या 11 डिसेंबरला 'दुर्गावती' अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.
या ख्रिसमसला 'कुली नंबर वन' अॅमेझॉन प्राइमवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात वरुण धवन आणि सारा अली खान यांनी भूमिका आहे.
अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' हा सिनेमा हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.