अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आता गौहरनं ईदचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गौहर खूपच सुंदर दिसत आहे.
गौहरचं स्टाईल स्टेटमेंट चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. या फोटोतील तिची स्टाईलसुद्धा तिच्या चाहत्यांना चांगलीच पसंतीस उतरली आहे.
गौहरने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘बर्याच दिवसानंतर मला नवीन नवरीसारखं दिसण्याची संधी मिळाली.’ यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा पारंपारिक सूट परिधान केलेला आहे ज्यावर गॉटी आणि मिरर वर्क होतं.
या सूटच्या ओढणीवर गुलाबी रंगाची डिझाइन आहे. गौहरनं पारंपारिक सूटसोबत कुंदनचं नेकपीस कॅरी केलं आहे.
गौहरने ग्लॅमर मेकअप, आयशॅडो, मस्करा, ब्लशर आणि न्यूड लिपस्टिक आणि केसात फुलं घातली आहेत. तिनं कॅरी केलेला हा ड्रेस शीतल बत्राचा डिझाईनर सूट आहे. या सूटची किंमत 22,000 रुपये आहे.