टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता नियाचा हटके एअरपोर्ट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
या फोटोंमध्ये निया प्रचंड कूल दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
आकाशी रंगाचं टी-शर्ट आणि बेल बॉटम पॅन्टमध्ये ती सुंदर दिसतेय.