Nissan गाडी विकत घ्यायच्या विचारात आहात, कंपनीकडून मिळतेय तब्बल इतक्या रुपयांची सूट
Nissan Magnite Discount : नवे आरडीई आणि बीएस6 फेज 2 नियम पाहता निसान मॅग्नाईटवर मोठी सवलत मिळत आहे. 2022 आणि 2023 या दोन्ही मॉडेलच्या एसयुव्हीवर डिस्काउंट मिळत आहे.
1 / 5
नवी एसयुव्ही कार खरेदी करण्याचा प्लान आखला असेल तर निसान कंपनीनं एक चांगली ऑफर दिली आहे. निसान मॅग्नाईट एसयुव्हीवर 90,100 रुपयांची सवलत मिळत आहे. कंपनी 2022 आणि 2023 या दोन्ही मॉडेलवर डिस्काउंट देत आहे. (Photo - Nissan)
2 / 5
मॅग्नाईटवर 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 20 हजारापर्यंत कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 15 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिलं जात आहे. या व्यतिरिक्त एलिजिबल कस्टमर्सना नव्या मॅग्नाईटवर 12,100 रुपयांपर्य प्री मेंटेनेस (3 वर्षापर्यतं) बेनफिट दिला जात आहे. (Photo - Nissan)
3 / 5
मॅग्नाईट ऑनलाईन बुक केल्यास 2 दोन हजार रुपयांची सूट. निसानच्या वेबसाईटवरून बुक केल्यास ही ऑफर आहे. बुकिंग व्यतिरिक्त 6.99 टक्के स्पेशल इंटरेस्ट ऑफर दिली जात आहे. निसान मॅग्नाईटच्या 2022 बीएस6 फेस 1 मॉडेलवर 90,100 रुपयांची सूट आहे. (Photo - Nissan)
4 / 5
निसान मॅग्नाईट 2023 बीएस6 फेस 1 मॉडेल खरेदी केल्यास 71,950 रुपयांची सूट मिळेल.जर तुम्ही 2023 बीएस6 फेस 2 मॉडेल विकत घ्यायचा विचार करत असाल तर 39,950 रुपयांची सूट आहे. फीचर्स आणि डिझाईनमुळे या गाडीची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे. (Photo - Nissan)
5 / 5
एसयुव्हीमध्ये 1.0एल नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणइ 1.0 एल टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन पॉवर आहे. या व्यतिरिक्त ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, रियर पार्किंग सेंसर, 8 इंचाची टचस्क्रिन इन्फोनटेन्मेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, एअर प्युअरीफायर, क्रुझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट यासारखे फीचर्स आहेत. (Photo - Nissan)