Nita Ambani : समुद्राला प्रेमाचे भरते! नीता अंबानी यांचे मरीन ड्राईव्हवरील हे फोटो पाहिलेत का?
Nita Ambani : कामाच्या धबाडग्यातून वेळ काढत, मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर नीता अंबानी यांनी निवांत क्षण अनुभवला. याठिकाणी त्यांनी फोटो सेशन केले. हे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : कामाच्या धबाडग्यातून वेळ काढत, मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर नीता अंबानी (Nita Ambani) यांनी निवांत क्षण अनुभवला. याठिकाणी त्यांनी फोटो सेशन केले. हे फोटो सध्या व्हायरल होत आहे. हे छायाचित्र 2005 मधील आहेत. पण ते सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नीता अंबानी यांच्या साधेपणाची चर्चा होत आहे. नीता अंबानी या आयपीएल आणि त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांची पत्नी आणि महिला बिझनेस वुमन नीता अंबानी या त्यांच्या लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जातात. प्रत्येक जणाला त्यांचा साधेपणा भावून जातो. सोशल मीडियामुळे त्यांचे काही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर त्यांचा हा निवांत क्षण कॅमेऱ्याला टिपता आला. ही छायाचित्र अर्थात जुनी आहेत. दाव्यानुसार हे फोटो 2005 मधील आहेत. नीता अंबानी काही निवांत वेळ मरीन ड्राईव्हवर होत्या. एक साध्या मुलीपासून ते अंबानी कुटुंबाची सून होण्यापर्यंतचा तिचा प्रवास सहज, साधा नाही. साधेपणा आणि कष्टाने त्यांनी या कुटुंबाला सांभाळले. मुकेश अंबानी यांच्या अनेक निर्णयात त्यांचा हात आहे. नीता अंबानी यांच्या साधेपणाचा आणि सामाजिक कार्याचा सर्वांनाच हेवा वाटतो. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी देशातील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्याविषयी माहिती संग्रही ठेवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. आयपीएलपासून नीता अंबानी यांच्याविषयी मोठी चर्चा आहे. नीता अंबानी यांच्या लाईफस्टाईलचे अनेक जण चाहते आहेत. ते त्यांना फॉलो करतात. अनेकांना या श्रीमंत घरातील लोक काय करतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो. त्यांची जीवनशैली काय, ते काय जेवतात. कोणत्या पुजा पद्धती करतात. परंपरांचं कसं पालन करतात, याविषयी माहिती घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. नीता अंबानी या सोशल मीडियापासून कोसो दूर आहेत. पण सोशल मीडियावर त्यांची छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल होतात. त्यांची चर्चा रंगते. नीता अंबानी या आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्याविषयी अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. नीता अंबानी जगातील अनेक महिलांच्या प्रेरणा स्थान आहेत. त्या अनेक सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत.