‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी
ही बाईक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. यामध्ये एक 48V, 250W इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. (Atum 1.0 electric motorcycle)
-
-
हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनी Atumobiles Pvt Ltd ने गेल्या वर्षी अॅटम 1.0 (Atum 1.0) ही इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात सादर केली होती. या बाईकची किंमत 50,000 रुपयांपासून सुरू होते. लॉन्च झाल्यापासून या बाईकला आतापर्यंत 400 हून अधिक बुकिंग्स मिळाल्या आहेत, त्याचबरोबर या बाईकची डिलिव्हरी देखील सुरू करण्यात आली आहे.
-
-
सुरुवातीला कॅफे-रेसर शैलीची ही इलेक्ट्रिक बाइक Atum 1.0 केवळ 10 ग्राहकांना देण्यात आली आहे. ही बाईक इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी (ICAT) द्वारे सर्टिफाईड (प्रमाणित) आहे.
-
-
ही बाईक पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. ही बाईक नॉर्मल थ्री-पिन सॉकेटद्वारे चार्ज करता येते. यामध्ये एक 48V, 250W इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे.
-
-
या बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी (फीचर्स) बोलायचे झाल्यास, यात एलईडी टर्न इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प्स, स्टायलिश कॅफे-रेसर डिझाईन, एलईडी टेललाईट्स, आरामदायक सीट, डिजिटल डिस्प्ले, गो-वेट फॅट टायर्स आणि 280 मिमी ग्राऊंड क्लीयरन्स मिळेल.
-
-
Atum 1.0 ची बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक तब्बल 100 किलोमीटपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
-
-
विशेष म्हणजे ही बाईक खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायस्न्स (चालक परवाना) नसलं तरी चालेल. तसेच या बाईकचे रजिस्ट्रेशन करण्याचीदेखील गरज नाही. तसेच कोणत्याही वयाचे लोक ही बाईक चालवू शकतात.