अभिनेत्री आणि उत्तम डान्सर नोरा फतेहीनं आता अनोखं सेलिब्रेशन केलं आहे. त्याला कारणही स्पेशल आहे.
आता नोराचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.
सेलिब्रेशनसाठी तिनं चक्क उंट सफारी केली आहे. उंटावर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन तिनं फोटोशूट केला आहे.
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.
नोराबद्दल खास गोष्ट सांगायची झाली तर ती नेहमी तिच्या डान्सची स्वत:च कोरिओग्राफी करते.
तिचे हे उंट सफारीचे फोटो चाहत्यांनी चांगलेच व्हायरल केले आहेत.