दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे. रश्मिकावर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होत असतो.
24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.
एवढंच नाही तर गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर रश्मिकाचं नाव समोर येतं. सोबतच रश्मिका आता ट्विटरवरसुद्धा ट्रेंड मध्ये आहे.
सोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री साईपल्लवीसुद्धा जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करतेय.
साईपल्लवी तिच्या अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे की कधीही मेकअप करत नाही. तिच्या म्हणण्यानुसार आपलं नैसर्गिक सौंदर्य जपलं पाहिजे.
सध्या रश्मिका मंदाना आणि साईपल्लवीला महाराष्ट्रातून भरभरुन प्रेम मिळत आहे.