Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 10 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट घडामोडी घडत असतात. त्यातून चांगलं ते घेऊन पुढे गेलं पाहीजे. त्यामुळे काम करण्याची एक उर्जा मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आपण शिक्षण काय घेतलं आहे आणि काय काम करतो याचं आकलन केलं पाहीजे. नाहीतर आपलं शिक्षण पैशांच्या हव्यासापायी वाया जाईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. काही अक्रित घडामोडी घडतील. पण त्यात सकारात्मक दृष्टीकोनातून एक एक पाऊल पुढे टाका. शुभ अक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
आपल्याला कोणत्याही कामात यश फक्त आपल्या मेहनतीमुळे मिळते, हे लक्षात ठेवा. आपल्यासाठी कोणतरी धावत येईल हे आता विसरून जा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
शेजारी आपल्यासोबत कसा वागतो याकडे दुर्लक्ष करा. कारण अनेकदा आपण या गुंतून राहतो आणि खरं ध्येय बाजूला राहतं. भविष्याचा विचार करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
आपल्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. पण आयुष्य असंच असतं. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या. आपली मतं इतरांवर लादणं चुकीचं आहे. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला मदत होईल. त्यांचा सल्ला ऐकून पावलं उचला. नक्कीच त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. मर्यादा पाळा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
कामानिमित्त काही प्रवास करावा लागू शकतो. पण हा प्रवास आपल्या कामासाठीच आहे हे लक्षात ठेवा. आळसपणा करून चालढकलपणा करू नका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)