अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
आता नुकतंच तिने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरच्या लग्नाला हजेरी लावली.
या लग्नात सईचा हा लूक लक्षवेधी ठरला. ‘ओल्ड स्कूल’ अवतारात सईनं सर्वांच्या नजरा खेचल्या.
आता सईनं या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘Going Old School’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.