दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीचवर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीचवरील ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य आणि ग्रामस्थांनी त्या कासवाला जीवनदान दिले.
दरवर्षी दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची अनेक मादी कासव येतात. त्या ठिकाणी ते अंडी घालतात.
या कासवांच्या पिल्लांचे सरंक्षण करुन त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्यांना सुरक्षित पुन्हा पाण्यात सोडण्याचे काम करतात.
ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य हे नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर फेरफटका मारत असताना त्यांना याच जातीचे कासव आढळले.
त्यावेळी ते पूर्णपणे जाळ्यात फसलेले होते. त्याला हात पायही हलवता येत नव्हते.
त्यानंतर या ग्रामस्थांनी सर्व जाळे कापून गुरफटलेल्या जाळ्यातून कासवला यशस्वीरित्या सोडवले.
त्यानतंर त्याला पुन्हा समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले. त्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.