Onion Market Rate : या महिन्यात कांद्याचा दर दुप्पट होण्याची शक्यता
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहून कांद्यावर निर्बंध अथवा विदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे. बदलत्या वातावरणामुळे चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे.

कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव दुप्पट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.Image Credit source: tv9 marathi
- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात पाचशे रुपये क्विंटल मागे मोठी वाढ झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ मोठी वाढ झाली आहे.
- कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव दुप्पट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
- केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहून कांद्यावर निर्बंध अथवा विदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे. बदलत्या वातावरणामुळे चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे.
- तेराशे वाहनातून बारा हजार क्विंटल कांद्याची आवक करण्यात आली होती. त्याला जास्तीत जास्त 2301 रुपये, कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2100 रुपये इतका क्विंटलला बाजार भाव मिळाला आहे.
- कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, अनेक शेतकऱ्यांनी घरात कांदा साठवून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा आता हळूहळू बाजारात यायला सुरुवात होईल.