Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : अवकाळीने द्राक्ष उत्पादनात घट, वादळी वाऱ्याने तर फळबागाच हिरावल्या

सातारा : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट हे सुरुच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहेच शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.हंगाम अंतिम टप्प्यात अन् द्राक्ष तोड सुरु असतानाच जिल्ह्यातील माण तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळीची अवकृपा ही सुरु आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा ह्या भुईसपाट झाल्या आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग आडवी झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. आता न भरुन निघणारे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

| Updated on: Apr 12, 2022 | 11:40 AM
आंबा फळपिकाचेही नुकसान: सातारा जिल्ह्यातील देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा सोमवारी झालेल्या चक्रीवादळात भुईसपाट झाला आहे . या पावसामुळे कृष्णराव बाबर यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

1 / 4
पावणे दोन एकर बाग भुईसपाट:  चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली.द्राक्ष तोडणीला आले असतानाच हे संकट त्यांच्यावर ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट नव्हे उत्पादनच पदरी पडते की नाही अशी स्थिती आहे.

2 / 4
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी: महिन्याकाठी वातावरणात बदल हा ठरलेलाच आहे. याचा सर्वाधिक फटका हा फळबागायतदार शेतकऱ्यांना बसलेला आहे. हवामान विभागाने अवकाळीचा अंदाज वर्तवला होता पण वाढलेल्या मुक्कामामुळे फळबागांचे अधिकचे नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे.

3 / 4
निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

4 / 4
Follow us
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.