याप्रसंगी विटावा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता संतोष तोडकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यासमयी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना महिला आघाडी संघटिका लता पाटील, माजी नगरसेवक राम रेपाळे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, चौरंगचे अशोक हांडे, माजी नगरसेविका सौ.मालती पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक राजन किणे तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कळवा, खारीगाव, विटावा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.