महाराष्ट्रबाहेरुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग करुन तपासणी केली जात आहे.
या तपासणी दरम्यान संशयित आढळल्यास तात्काळ अँटिजन, आर टी पीसी आर तपासणीही केली जाणार आहे.
रुग्ण, संशयित आढळल्यास त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्यात येत आहे.
बोरीवली रेल्वे स्टेशनवर आतापर्यंत 200 पेक्षा जास्त प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.
या स्क्रिनिंग दरम्यान एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यानंतर त्याची अँटिजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ती व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. त्यानंतर तिला तात्काळ कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं.
बोरीवलीप्रमाणेच अंधेरी, दादर, वांद्रे, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, एलटीटीएन स्थानकांवर सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे.