Photo Gallery: केळी बागांवर विघ्न कायम, बागा अंतिम टप्प्यात असतानाही कशाचा धोका?
जळगाव : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवरच नाही तर सर्वाधिक नुकसान हे फळ बागायतदारांचे झाले आहे. ऐन फळधारणा आणि मोहर लागण्याच्या अवस्थेतच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. आता कुठे वातावरण निवळले आहे तर वाढत्या थंडीमुळे मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात थंडीचा परिणाम थंडीमुळे केळीवर करपा, चरका रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केळीचे नवतीची पानेही फाटली असून केळी उत्पन्नावर घट होत आहे. निसर्गापुढे शेतकरी हतबल झाला आहे केळी उत्पादक शेतकरी जीवापाड मेहनत करूनही आता झालेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे.
Most Read Stories