हिवाळ्यात अतीझोप घेणे शरीरासाठी ठरते वाईट

| Updated on: Jan 02, 2023 | 4:28 PM
 जसजशी थंडी वाढत्ये, आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी अंथरुणातून उठणे कठीण वाटत असेल. हिवाळ्यात लोकांना जास्त झोप येणे स्वाभाविक आहे, पण जास्त झोपेमुळे अनेक वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात जास्त झोपायची गरज नाही. प्रौढ व्यक्तींना 8 तासांची झोप पुरते. जास्त झोपल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्याचे काय दुष्परिणाम होतात जाणून घेऊया.

1 / 6
डोकेदुखी - जर तुम्ही थंडीच्या दिवसात नेहमीपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला सकाळी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते, जास्त झोपल्याने मेंदूतील सेरोटोनिनसह काही न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम होऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

2 / 6
पाठीचे दुखणे - अतीझोपेमुळे तुम्हाला सकाळी पाठदुखीचा त्रास होऊ शकतो आणि पाठीच्या समस्या वाढू शकतात. दीर्घकाळ विश्रांतीमुळे शरीर कडक होणे, रक्तप्रवाह कमी होणे, खराब गादीवर बराच काळ झोपणे, जास्त झोपल्यामुळे स्नायूंमध्ये थकवा जाणवणे, झोपेची अयोग्य स्थिती या सर्व गोष्टींमुळे सकाळी उठल्यावर पाठदुखी होऊ शकते.

3 / 6
लठ्ठपणा - चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पण झोप जास्त झाली किंवा खूप कमी झाली तर वजन वाढू शकते. काही संशोधनात असे दिसून आले की जे लोक रोज रात्री 8 तासांपेक्षा जास्त झोपतात ते 7 ते 8 तास झोपणाऱ्या लोकांपेक्षा लठ्ठ होण्याची शक्यता असते.

4 / 6
मधुमेह - रात्री खूप जास्त झोपलात किंवा कमी झोप झाली तर याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर प्रभाव पडू शकतो. आणि मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

5 / 6
डिप्रेशन -  नियमित चांगल्या झोपेची सवय ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. निद्रानाश आणि अतिनिद्रानाश ही दोन्ही डिप्रेशनची (नैराश्याची) लक्षणे आहेत. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, त्यांनी नियमितपणे जास्त झोप घेतल्यास त्यांची लक्षणे आणखी बिघडू शकतात.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.