कंदीलावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पैठणी कंदीलांचा नवा साज
कागद, लाकूड अशा पर्यावरणपूरक वस्तू वापरुन तयार करण्यात आलेल्या आकाशकंदीलांना पैठणी साड्यांची जोड 'हर्षाभि क्रिएशन'ने दिली आहे
Follow us
‘राजश्री, ‘तेजोमय’, मयुर, नभोमणी, अरण्या, अनन्या, गुलकंद, नक्षत्र ही नावे कोणत्या दागिन्यांची नसून दिवाळी तेजोमय करणाऱ्या आकाश कंदीलांची आहेत.
कंदीलांना अशी हटके नावे देण्याची भन्नाट कल्पना आहे ‘हर्षाभि क्रिएशन्स’ची. कंदीलांच्या नावानुसारच कंदीलांचे स्वरुप आहे.
कागद, लाकूड अशा पर्यावरणपूरक वस्तू वापरुन कंदील बनवण्यात आले असून पैठणी साड्यांची जोड देत बनवलेले नाविन्यपूर्ण कंदील प्रत्येकाच्या पसंतीला उतरत आहेत.
नवी मुंबईतील हर्षदा साटम आणि अभिषेक साटम या जोडप्याने तयार केलेल्या या कंदीलांना सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवे
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पर्यावरणपूरक कंदील बनवत असून गेल्या वर्षी कंदीलांना जरीच्या साड्या, खण, लोकर यांची सजावट केली आणि ह्या वर्षी पैठणी साड्यांचे पहिल्यांदाच वेगळे कंदील बनवले असल्याचे अभिषेकने सांगितले
अभिषेक आणि त्याची पत्नी हर्षदा यांनी त्यांच्या नावावरून ‘हर्षाभि क्रिएशन्स’ सुरू केले आहे.
हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही. या कंदीलांसाठी कागदी पिशवीही तयार केली आहे.
मुंबई, विरार, बोरिवली, पुणे, लालबाग आदी भागातून या कंदीलांसाठी मागणी येत असल्याचे अभिषेकने सांगितले.