बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. टीम इंडियाने जिंकेलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2007 आणि वन डे वर्ल्ड कप 2011 ला त्याची महत्त्वाची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. आता टीम इंडियाच्या हेड कोचपदी त्याची नियुक्ती झाली आहे.
गौतम गंभीर याने आपल्या निवृत्तीनंतर आयपीएलध्ये अनेक संघांमध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडली. आता झालेल्या आयपीएलमध्ये विजेता ठरलेल्या केकेआर संघाचा गौतम गंभीर हेड कोच होता.
गंभीर आता टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर त्याला शुभेच्छा देत आहेत. शाहिद आफ्रिदीने त्याला शुभेच्छा देताना काय म्हटला जाणून घ्या.
मला वाटतं की ही एक मोठी संधी आहे. या संधीचा गौतम गंभीर कसा फायदा घेतो हे पाहावं लागणार आहे. मी गंभीरच्या अनेक मुलाखती पाहिल्या असून तो एकदम सकारत्मक बोलतो आणि एकदम सरळ असल्याचं शाहिद आफ्रिदी म्हणाला.
शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर दोघे भर सामन्यात एकमेकांना भिडले होते. 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वाद झालेला. त्यावेळी गंभीरला दंड ठोठावण्यात आला होता.