लाटांवर अभियांत्रिकीचा चमत्कार, देशातील पहिला उभा-लिफ्ट सागरी पूल तयार, काय आहे विशेष

| Updated on: Apr 06, 2025 | 4:56 PM

Pamban Bridge inauguration: भारताचा अभियांत्रिकी चमत्कार म्हणून आणखी एका पुलाची वर्णन करावे लागेल. हा पूल इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे भारतातील पहिल्या उभ्या-लिफ्ट समुद्री पूल पांबनचे उद्घाटन केले.

1 / 5
रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पांबन पूलचा समावेश केला आहे. हा पूल केवळ तांत्रिक कामगिरीच नाही तर तमिळ संस्कृती, भाषा आणि प्राचीन सभ्यतेच्या वारशाशीही घट्ट जोडलेला आहे. उच्च दर्जाचे पेंट आणि पूर्णपणे वेल्डेड जॉइंट्स वापरले आहे. त्यामुळे ते अधिक टिकाऊ होईल.

2 / 5
पांबन पुलाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, तमिळ इतिहास आणि संस्कृतीचा एक महान वास्तुशिल्प चमत्कार हा पूल आहे.  भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे. तो संपूर्ण भारताला समर्पित केला गेला.

3 / 5
1914 मध्ये बांधलेला जुना पांबन पूल खराब झाला होता. यामुळे डिसेंबर 2022 मध्ये तो पूल बंद करण्यात आला. आता नव्या तंत्रज्ञानाने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. 550 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला. या नवीन पुलावर पॉलीसिलॉक्सेन कोटिंग बसवण्यात आले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे होणाऱ्या गंजापासून पुलाचे संरक्षण होईल.

4 / 5
समुद्रावर बांधलेला हा भारतातील पहिला उभा लिफ्ट पूल आहे. हा पूल 2.08 किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यात 99 स्पॅन आणि 72.5 मीटर लांबीचा लिफ्ट स्पॅन आहे. जे 17 मीटरपर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे मोठी जहाजे आरामात जाऊ शकतात. स्टेनलेस स्टीलचा वापरामुळे मजबुतीकरण आले आहे.

5 / 5
पांबन पूल रामेश्वरमला मुख्य भूभागाशी जोडतो. त्याच ठिकाणी रामायणानुसार रामसेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली. रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे या पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलाला 2019 मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती.