'पंचायत 3' ही सीरिज येत्या 28 मे रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ स्ट्रीम होणार आहे. 15 मे रोजी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर अजूनही त्याचीच चर्चा आहे. या सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळालंय, त्याचीही माहिती समोर आली आहे.
या सीरिजच्या तिसऱ्या सिझनसाठी सर्वाधिक मानधन जितेंद्र कुमारला मिळालं आहे. यामध्ये त्याने सचिवजी अर्थात अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या एका एपिसोडसाठी त्याला 70 हजार रुपये मानधन मिळालं आहे.
'पंचायत'मध्ये प्रधानजी बृज भूषण दुबे यांची भूमिका साकारणारे अभिनेते रघुबीर यादव यांना एका एपिसोडसाठी 40 हजार रुपये मानधन मिळालं आहे. त्यांनी या सीरिजमध्ये नीना गुप्ता (मंजू देवी) यांच्या पतीची भूमिका साकारली आहे.
'पंचायत'मध्ये प्रधानजींची पत्नी मंजू देवी दुबे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. तिसऱ्या सिझनमध्येही त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या सीरिजच्या एका एपिसोडसाठी त्यांना 50 रुपये फी मिळाली आहे.
'पंचायत'मध्ये सचिवजींचे सहकाही आणि फुलेरा ग्राम पंचायतचे कार्यालय सहाय्यक विकास याची भूमिका अभिनेता चंदन रॉयने साकारली आहे. यासाठी त्याला प्रत्येक एपिसोडनुसार 20 हजार रुपये मानधन मिळालं आहे.
या सीरिजमध्ये उप-प्रधान प्रल्हाद पांडेची भूमिका साकारणारा अभिनेता फैजल मलिकलाही चंदन रॉय इतकंच मानधन मिळालं आहे. एका एपिसोडसाठी त्यालाही 20 हजार रुपये मिळाले आहेत.